कराड बाजार समितीच्या गुळ मार्केट कमानीस स्व.यशवंतराव चव्हाण (साहेब) यांचे नाव देण्याची मागणी
Published:Apr 04, 2021 03:07 AM | Updated:Apr 04, 2021 03:07 AM
News By : Muktagiri Web Team
कराड : शेती उत्पन्न बाजार समितीच्या गुळ मार्केटच्या 4 नं. गेटला कमान ऊभी करण्यात आलेली आहे. स्व.यशवंतराव चव्हाण यांची जन्म शताब्दी नुकतीच होऊन गेलेली आहे. या जन्म शताब्दी निमित्त शासनाने बाजार समितीच्या आवारात अनेक कामे केली आहेत. स्व.यशवंतराव चव्हाण (साहेब) हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी कराडच्या विकासासाठी बहुमूल्य योगदान दिले आहे. त्या बरोबरच चव्हाण साहेबांनी सहकाराची पाळेमुळे खोलवर रुजवलेली आहेत तरी सर्व शेतकरी बांधव, संघटना व तमाम कराड तालुक्यातील जनतेच्यावतीने या कमाणीस स्व.यशवंतराव चव्हाण प्रवेशद्वार हे नाव द्यावे अशी मागणी पत्रकाद्वारे यशवंतप्रेमींनी केली आहे.