माण तालुक्यातील मूग पिकाला कीड व रोगाचा फटका

शेतकरी आर्थिक संकटात; नुकसान भरपाई देण्याची मागणी 
Published:Aug 24, 2020 04:02 PM | Updated:Aug 24, 2020 04:02 PM
News By : Muktagiri Web Team
माण तालुक्यातील मूग पिकाला कीड व रोगाचा फटका

कमी कालावधीत रोख पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी मूग पिकाची कोरडवाहू पट्ट्यात आंतरपीक म्हणूनही लागवड करतात. मात्र, यंदाच्या हंगामात लागवड झालेल्या मुगाचे संपूर्ण पीक कीड आणि रोगांमुळे शेतकर्‍यांच्या हातातून गेले आहे. त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्चसुद्धा निघण्याची शक्यता नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांमधून होत आहे.