अवैध दारू विक्री प्रकरणी पाच महिन्यात साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

उंब्रज पोलिसांची कामगिरी ः मसूरमध्ये देशी दारू विक्री प्रकरणी कारवाई
Published:Jun 11, 2021 03:22 PM | Updated:Jun 11, 2021 03:22 PM
News By : उंब्रज प्रतिनिधी | महेश सुर्यवंशी
 अवैध दारू विक्री प्रकरणी पाच महिन्यात साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

उंब्रज पोलीस स्टेशनने सन 2020 मध्ये सुमारे 137 दारूच्या रेड करून 22 लाख 34 हजार 771 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर सन 2021 मध्ये 10 जून अखेर 75 दारू रेड करून सुमारे 4 लाख 30 हजार 436 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच ह्या आठवड्यात पाली, मसूर, उंब्रज, इंदोली, तारळे भागात कारवाई करून 72 हजार 280 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.