डॉ. प्रकाश आमटेंच्या ‘लोक बिरादरी’साठी चक्क सहा हजार किमी सायकलिंग

डॉ. अमित समर्थ यांचा आगळावेगळा उपक्रम : धाडसी उपक्रमाचं सर्व स्तरांतून होतंय कौतुक
Published:Feb 16, 2021 11:01 AM | Updated:Feb 16, 2021 11:01 AM
News By : Muktagiri Web Team
डॉ. प्रकाश आमटेंच्या ‘लोक बिरादरी’साठी चक्क सहा हजार किमी सायकलिंग

आपण अनेक वेळेला असे म्हणतो की, जगात अशक्य असे काहीच नाही. एखाद्या चांगल्या कार्याला मदत करण्यासाठी आर्थिक सहकार्याबरोबरच आपल्या शारीरिक कष्टानेही आपण त्यांना मदत करू शकतो. असेच एक ध्येय वेडे महाराष्ट्रातील सायकल प्रेमींचे हिरो डॉ. अमित समर्थ हे डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘लोक बिरादरी’ या प्रकल्पास आर्थिक सहकार्य मिळावे व जे आदिवासी भागात नवोदित खेळाडू आहेत, अशा मागास भागाला उत्तम क्रीडा साहित्य मिळावे, सोयीसुविधा मिळाव्या यासाठी सायकलिंग करत आहेत.