खटाव तहसीलदार इन अ‍ॅक्शन; वाळू माफियांवर मोठ्या कारवाया 

तहसीलदार किरण जमदाडे यांनी केला लाखोंचा मुद्देमाल जप्त
Published:Mar 02, 2021 03:38 PM | Updated:Mar 02, 2021 03:38 PM
News By : Muktagiri Web Team
खटाव तहसीलदार इन अ‍ॅक्शन; वाळू माफियांवर मोठ्या कारवाया 

खटाव तालुक्यातील येरळा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणार्‍यावर स्वतः खटाव तहसीलदार आणि पथक यांनी गेल्या दोन दिवसांपासून कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या दोन दिवसांत विविध ठिकाणी केलेल्या वाळू कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल तहसीलदार किरण जमदाडे यांनी ताब्यात घेतला आहे. तर स्वतः तहसीलदार हे कारवाईत सहभागी होत असल्याने आता अवैध वाळू वाहतुकीला आळा बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.