चालकाचा ब्लड प्रेशर लो झाल्याने उसाचा ट्रॅक्टर पलटी
कराड मलकापूर येथे उपमार्गावर अपघात
Published:Nov 22, 2022 07:55 PM | Updated:Nov 22, 2022 07:55 PM
News By : मलकापूर I सुनिल परिट
ट्रॅक्टर चालकाचा ब्लडप्रेशर झाला लो आणि ट्रॅक्टर वरला सुटला ताबा उसाने भरलेला ट्रॅक्टर हायवे वरून खाली येऊन नाल्यात पलटी.. सर्विस रस्त्यावर नुसता ऊसच ऊस मलकापूर कराड येथील घटना. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड मलकापूर येथील बुलेट शोरूम समोर उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ड्रायव्हरचा ब्लड प्रेशर लो झाल्यामुळे ड्रायव्हरचा ट्रॅक्टर वरील ताबा सुटला आणि उसाने भरलेला ट्रॅक्टर हायवे वरून खाली येऊन नाल्यात पलटी झाला सर्विस रोडवर ट्रॉल्या पलटी झाल्याने संपूर्ण ऊस सर्विस रोडवर पसरला दरम्यान या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही उसाने भरलेली ट्रॉली सर्विस रोडवर पलटी झाल्याने रस्त्यावर ऊस पसरला आणि काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.. सर्विस रोडवर पलटी झालेल्या या ट्रॅक्टरला पाहण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या बग्यांनी मात्र मोठी गर्दी केली यामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला..