कृष्णा कारखाना जिल्ह्यात सर्वाधिक जीएसटी कर भरण्यात आघाडीवर

Published:Jul 02, 2022 12:40 PM | Updated:Jul 02, 2022 12:40 PM
News By : कराड | संदीप चेणगे
कृष्णा कारखाना जिल्ह्यात सर्वाधिक जीएसटी कर भरण्यात आघाडीवर

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने २२ कोटींचा जीएसटी कर भरला आहे. याशिवाय व्हॅट म्हणजेच मूल्यवर्धित करापोटी सुमारे ९० कोटींचा भरणा शासनाकडे केला आहे. त्यामुळे जीएसटी आणि व्हॅट कर भरण्यात कृष्णा कारखाना आघाडीवर राहिला असून, सर्वाधिक व्हॅट कर भरणारा कारखाना म्हणूनही कृष्णा कारखान्याचा लवकरच सन्मान केला जाणार आहे.