कृष्णा हॉस्पिटलने कॅन्सर उपचारांसाठी दिलेल्या योगदानाची जागतिक पातळीवर दखल

Published:Sep 20, 2022 03:10 PM | Updated:Sep 20, 2022 03:10 PM
News By : कराड | संदीप चेणगे
कृष्णा हॉस्पिटलने कॅन्सर उपचारांसाठी दिलेल्या योगदानाची जागतिक पातळीवर दखल

महाराष्ट्रातील एकमेव वैद्यकीय विद्यापीठ पॅरिस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत कृष्णा अभिमत विद्यापीठाला युरोपियन सोसायटी फॉर मेडिकल ऑन्कोलॉजीची मान्यताप्राप्त संस्था म्हणून प्रमाणित करण्यात आले. अशाप्रकारची मान्यता मिळविणारे कृष्णा विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एकमेव वैद्यकीय विद्यापीठ असून, या मान्यतेमुळे युरोपीय राष्ट्रांतील मुलामुलींना आता कृष्णा विद्यापीठात येऊन आरोग्यसेवेचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.