‘युगंधरा’च्या आयुष्यात ‘अश्‍विनीताईं’नी पेरली प्रकाशाची फुलं..!

अंध विद्यार्थिनी अन् तंत्रस्नेही शिक्षिकेची प्रेरणादायी कहाणी; विविध उपक्रमांतून विद्यार्थीही झाले तंत्रस्नेही
Published:Oct 19, 2020 03:58 PM | Updated:Oct 19, 2020 03:58 PM
News By : Muktagiri Web Team
‘युगंधरा’च्या आयुष्यात ‘अश्‍विनीताईं’नी पेरली प्रकाशाची फुलं..!

सातारा : ‘ती’ जन्मत:च अंध...तिच्या शिक्षणाचं काय होणार...‘ती’ समाजात आपलं वेगळंपण कसं निर्माण करणार, असे एक ना अनेक प्रश्‍न तिच्या घरच्यांसमोर आ वासून उभे होते. पण समाजात असे काही शिक्षक आहेत, की जे मुलांच्या शिक्षणासाठी स्वतः तन-मन-धन अर्पण करून झटतात..अशाच तंत्रस्नेही शिक्षिका अश्‍विनीताई क्षीरसागर यांनी बे्रल लिपीचं ज्ञान आत्मसात करून अंध ‘युगंधरा तोडकर’ या मुलीच्या आयुष्यात प्रकाशाची फुलं पेरलीत. त्यामुळं युगंधरा अश्‍विनीताईंच्या मार्गदर्शनाखाली तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेत चमकताना