मायणी वनक्षेत्राला शॉर्ट सर्किटमुळे आग

ग्रामस्थ व वनकर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे वनसंपदा बचावली
Published:Apr 01, 2021 07:53 PM | Updated:Apr 01, 2021 07:53 PM
News By : Muktagiri Web Team
मायणी वनक्षेत्राला शॉर्ट सर्किटमुळे आग

मायणी (ता. खटाव) येथील पक्षी आश्रयस्थानाला नुकताच मायणी पक्षी संवर्धनाचा दर्जा मिळाला असून, हे मायणी पक्षी संवर्धन महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. जवळपास 65 हेक्टर क्षेत्र असलेल्या या पक्षी संवर्धन/वनक्षेत्राला गुरुवारी (दि. 1) सकाळी अकरा वाजता शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीवर वन कर्मचारी, मायणीतील युवक व ग्रामस्थांकडून वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने मायणीची वनसंपदा बचावली आहे.