साातार्‍यात गुटख्याची तब्बल 39 पोती जप्त 

एलसीबीची कारवाई ः एकास अटक, बोलेरो जीपसह साडेदहा लाखांचा मुद्देमाल ताब्यात
Published:Apr 05, 2021 01:52 PM | Updated:Apr 05, 2021 01:52 PM
News By : Muktagiri Web Team
साातार्‍यात गुटख्याची तब्बल 39 पोती जप्त 

बुधवार पेठेत अवैधरित्या गुटखा विक्रीसाठी आणल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असून गुटखा पानमसाल्याची तब्बल 39 पोती व बोलेरो जीप असा साडेदहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी शाहरुख उर्फ मुबीन अस्लम बागवान वय 28 वर्षे रा 59, बुधवार पेठ सातारा यास पोलिसांनी अटक केली आहे.