महिला पोलिसाचा मोबाईल जबरी चोरीचा प्रयत्न करणारा जेरबंद

Published:Apr 29, 2021 09:05 PM | Updated:Apr 29, 2021 09:05 PM
News By : Muktagiri Web Team
महिला पोलिसाचा मोबाईल जबरी चोरीचा प्रयत्न करणारा जेरबंद

महिला पोलिसांचा मोबाईल हिसकावून जबरी चोरीचा प्रयत्न करणार्‍या चोरट्यास शाहूपुरी पोलिसांनी रामनगर कॅनॉल परिसरात शिताफीने जेरबंद केले. यल्ला ऊर्फ विराज अनिल कोळी वय 20 राहणार आकाशवाणी झोपडपट्टी सातारा असे त्याचे नाव आहे.