जोरदार शिव्यांच्या भडिमारात बोरीचा बार उत्साहात संपन्न

Published:Aug 03, 2022 08:43 PM | Updated:Aug 03, 2022 08:43 PM
News By : Satara
जोरदार शिव्यांच्या भडिमारात बोरीचा बार उत्साहात संपन्न

लोणंद : संपूर्ण महाराष्ट्रात शिव्याशाप देण्याची अनोखी परंपरा असलेला बोरीचा बार यंदाही परंपरागत पद्धतीने बुधवारी दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी येथीय वाहणाऱ्या ओढ्यात पार पडला. दोन्ही गावांतील महिलांनी सनई हलगीच्या तालावर वाजत गाजत ओढ्यावर एकत्र येऊन एकमेकींवर शिव्यांचा भडिमार करत अनोखी परंपरा कायम ठेवली.