शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा

भाजपा शिक्षक आघाडीची मागणी; गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर
Published:Sep 11, 2021 07:37 PM | Updated:Sep 11, 2021 07:37 PM
News By : Muktagiri Web Team
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा

समाजातील महत्वाचा घटक असूनही शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सतत पाठपुरावा करूनही राज्य शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले आणि तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष सतीश चव्हाण यांनी सांगितले.