कोरोना काळात ब्रह्मपुरी कोविड सेंटरमधील कर्मचार्‍यांचे कार्य कौतुकास्पद

सिद्धेश्‍वर पुस्तके  यांचे प्रतिपादन; रहिमतपूर येथे ‘कोरोना योद्ध्यां’चा सत्कार
Published:Aug 14, 2020 10:10 AM | Updated:Aug 14, 2020 10:10 AM
News By : Muktagiri Web Team
कोरोना काळात ब्रह्मपुरी कोविड सेंटरमधील कर्मचार्‍यांचे कार्य कौतुकास्पद

‘सध्याच्या कोरोना आपत्तीच्या काळात ब्रह्मपुरी येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांची, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सेवाभावी वृत्तीने देखभाल करणार्‍या कर्मचार्‍याचे कार्य कौतुकास्पद आहे,’ असे प्रतिपादन सिद्धेश्‍वर पुस्तके यांनी व्यक्त केले.