रणजितसिंह देशमुख स्वगृही, काँग्रेसमध्ये परतणार...

दिग्गज कॉग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत प्रवेश ; माण मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांच्यात उत्साहाचे वातावरण
Published:Nov 10, 2020 04:36 PM | Updated:Nov 10, 2020 04:36 PM
News By : वडूज प्रतिनिधी I आकाश यादव
रणजितसिंह देशमुख स्वगृही, काँग्रेसमध्ये परतणार...

पृथ्वीराज बाबांशी झालेल्या समक्ष भेटीनंतर रणजितसिंह देशमुख यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित झाला. बुधवारी सकाळी ११ वाजता काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,पृथ्वीराज चव्हाण आणि राज्यातील काँग्रेसचे मंत्री , वरिष्ठ नेते यांच्या उपास्थितीत रणजितसिंह देशमुख काँग्रेस पक्षात स्वगृही प्रवेश करणार आहेत.