विधान परिषदेसाठी सातार्‍याला उमेदवार द्यावा

दीपाली गोडसे यांची मागणी : पदवीधर, शिक्षक मतदारसंघांमध्ये उमेदवारी देताना सातार्‍यावर अन्याय झाल्याची भावना
Published:Nov 07, 2020 09:05 PM | Updated:Nov 07, 2020 09:09 PM
News By : Muktagiri Web Team
विधान परिषदेसाठी सातार्‍याला उमेदवार द्यावा

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांमध्ये उमेदवार देताना सातारा जिल्ह्यावर कायमच अन्याय झालेला आहे. गेली अनेक दशके सातारा जिल्ह्याला या मतदारसंघात नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. आता या मतदारसंघासाठी सातार्‍यातील उमेदवार द्यावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष दीपाली गोडसे यांनी केली आहे.