विलासपूर व गोळीबार मैदान भागाच्या विकासासाठी  खा. उदयनराजेंच्या माध्यमातून  १२ कोटींचा निधी

उद्योजक संग्राम बर्गे यांची माहिती
Published:May 18, 2022 03:26 PM | Updated:May 18, 2022 03:31 PM
News By : Satara
विलासपूर व गोळीबार मैदान भागाच्या विकासासाठी  खा. उदयनराजेंच्या माध्यमातून  १२ कोटींचा निधी

सातारा शहरासह विस्‍तारित भागातील नागरिकांना सोयी-सुविधा देण्‍यासाठी खासदार  उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून शासनाने ४८ कोटी रुपये मंजूर केले. पैकी २५ कोटींचा निधी पालिकेकडे आला असून मे अखेर आणि २३ कोटी रुपये जमा होतील. शहराच्या पूर्वेला असणाऱ्या विलासपूर भागाच्या पायाभूत सुविधांसाठी बारा कोटी रूपये दिले जाणार आहेत, अशी माहिती येथील युवा उद्योजक व युवाशक्ती फाउंडेशन, विलासपूरचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांनी दिली.