मधुमक्षिका पालन व्यवसायातून शेतकर्‍यांनी आर्थिक उन्नती साधावी

वेदांतिकाराजे भोसले यांचे आवाहन : मधमाशा पालन तांत्रिक प्रात्यक्षिके व जनजागृती शिबिर उत्साहात
Published:Mar 02, 2021 03:47 PM | Updated:Mar 02, 2021 03:47 PM
News By : Muktagiri Web Team
मधुमक्षिका पालन व्यवसायातून शेतकर्‍यांनी आर्थिक उन्नती साधावी

‘आपला देश कृषिप्रधान देश आहे. मात्र नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट आदी समस्यांमुळे शेतीमध्ये अनंत अडचणी येत असतात. शेतकरी आर्थिक सक्षम राहण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय हा एकमेव पर्याय आहे. मधुमक्षिका पालन हा फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय असून, त्यासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य केले जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी या व्यवसायातून आपली आर्थिक उन्नती साधावी,’ असे आवाहन वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.