किराणा व्यापारी संघटनेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन

Published:Jun 03, 2021 06:46 PM | Updated:Jun 03, 2021 06:46 PM
News By : Muktagiri Web Team
किराणा व्यापारी संघटनेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन

जिल्ह्यात वाढत्या कोरोना बाधित संख्येमुळे लॉकडाऊन कडक करणे प्रशासनाला गरजेचे होते. परंतु यामधून किराणा दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळायला हवी जेणेकरून सामान्य नागरिकांचे हाल होणार नाहीत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढला जाईल. तसेच व्यापाऱ्यांनी सुद्धा दुकाने सुरु झाल्यानंतर प्रशासनाने दिलेल्या निर्बधांचे पालन करणे गरजेचे आहे. कारण कोरोना काळात नियमांचे पालन करणे हेच सर्वांच्या हातात आहे. - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री