फलटण शहरात दोन महिन्यांपासून जबरी चोरी करणारा चोरटा जेरबंद

फलटण शहर पोलिसांची कारवाई : दोन लाख 24 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
Published:Feb 26, 2021 01:35 PM | Updated:Feb 26, 2021 01:35 PM
News By : Muktagiri Web Team
फलटण शहरात दोन महिन्यांपासून जबरी चोरी करणारा चोरटा जेरबंद

गेली दोन महिन्यांपासून शहरातील स्वामी विवेकांनद नगर, अनंत मंगल कार्यालय, महाराजा मंगल कार्यालय या भागात मोपेड मोटार सायकलवरून जाणार्‍या महिला व मुलीच्या हातातील पर्स, अथवा गाडीचे बास्केट, हॅण्डेलला लावलेली पर्स उचलून व जबरदस्तीने हिसकावून जाणार्‍या एका आरोपीस व त्याकडून मुद्देमाल विकत घेणार्‍या तीन जणांना अटक करून नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात शहर पोलिसांना यश मिळाले आहे.