युवकाचा धारदार कोयत्याने वार करून खून
जुळेवाडी येथे वाढदिवस साजरा करताना घटना
Published:Nov 27, 2022 02:04 PM | Updated:Nov 27, 2022 02:04 PM
News By : Muktagiri Web Team
कराड : युवकाचा धारदार कोयत्याने वार करून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जुळेवाडी ता. कराड येथे शनिवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली असून संशयित फरार आहे. याबाबत खून झालेल्या युवकाच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे. राजवर्धन महादेव पाटील (वय 24 रा. जुळेवाडी ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जुळेवाडी ता. कराड येथे शनिवारी रात्री 8च्या सुमारास वाढदिवस साजरा होत असताना राजवर्धन पाटील याच्यावर धारदार कोयत्याने वार करून खून झाल्याचा प्रकार घडला आहे. संशयित विजय बाबुराव काशीद हा फरार असून खुनाचे कारण अस्पष्ट असून अधिक तपास पोलीस करत आहेत.