मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपकडून माघार, बावनकुळे यांची घोषणा

Published:Oct 17, 2022 01:10 PM | Updated:Oct 17, 2022 01:16 PM
News By : Muktagiri Web Team
मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपकडून माघार, बावनकुळे यांची घोषणा

भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी निवडणुकीतून माघार घेणार असल्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली. त्यानंतरही अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि भाजप-शिंदे गटात मुख्य लढत होती. शिवसेना ठाकरे गट आणि भाजपशिवाय, इतर बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये अपक्षांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आता अपक्ष आणि नोंदणीकृत नसलेले पक्ष कोणती भूमिका घेणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.