साताऱ्यात पोवई नाक्यावर शिवसेनेची निदर्शने

संजय राऊत यांच्यावरील कारवाई आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा केला निषेध
Published:Aug 01, 2022 09:47 PM | Updated:Aug 01, 2022 10:02 PM
News By : Satara
साताऱ्यात पोवई नाक्यावर शिवसेनेची निदर्शने

महाराष्ट्राबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व खासदार संजय राऊत यांच्यावर इडीने केलेली कारवाई या घटनांचा सातारा जिल्हा शिवसेना कार्यकारणी च्या वतीने निषेध करण्यात आला . शिवसैनिकांनी सोमवारी पोवई नाक्यावर शिवपुतळा परिसरात जोरदार निदर्शने केली पोलिसांनी निदर्शनानंतर आंदोलकांना ताब्यात घेतले.