आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात

Published:Mar 31, 2021 05:58 PM | Updated:Mar 31, 2021 05:58 PM
News By : Muktagiri Web Team
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलग 21व्या वर्षी गोडोली येथे रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. गोडोली मित्र समूह, युवा मोरया सामाजिक संस्था व कर्तव्य सोशल ग्रुप यांच्या वतीने आयोजित या शिबिरात सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांनी न चुकता यंदाही रक्तदान करून तब्ब्ल 40 वेळा रक्तदान करण्याचा विक्रम केला.