मनोजदादा घोरपडे यांचे कराड उत्तरमध्ये जंगी स्वागत
Published:Aug 31, 2022 08:57 AM | Updated:Aug 31, 2022 08:57 AM
News By : Muktagiri Web Team
कराड उत्तरचे भारतीय जनता पार्टीचे नेते व खटाव माण साखर कारखान्याचे को चेअरमन मनोजदादा घोरपडे यांचे त्यांच्या समर्थकांनी तासवडे टोलनाक्यावर फटके फोडून व जेशिबी मधून पुष्वृष्टी करून जोरदार स्वागत केले.
मनोजदादा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यांची आज कोल्हापूर कराग्रहतून दुपारी सुटका झाली. सायंकाळी 6 वाजता तासवडे टोल नाक्यावर त्यांचे हजारो कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी विक्रम पावसकर, महेश बाबा जाधव, सुरेश तात्या पाटील, जयवंत जगदाळे, जयवंत जाधव नाना, अण्णासाहेब निकम, संजय घोरपडे, विकास अण्णा गायकवाड, रणजीत माने, आदी उपस्थित होते.