दै.‘मुक्तागिरी’च्या दिवाळी अंकाने गुणवत्तेचा दर्जा कायम राखला

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे गौरवोद्गार ः दै. ‘मुक्तागिरी’च्या दिवाळी अंकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन
Published:Nov 11, 2020 08:24 PM | Updated:Nov 11, 2020 08:24 PM
News By : Muktagiri Web Team
दै.‘मुक्तागिरी’च्या दिवाळी अंकाने गुणवत्तेचा दर्जा कायम राखला

कोरोनासारख्या महामारीतून अवघा देश सावरत असतानाच दिवाळीचा सण येत आहे. या पार्श्‍वभूमीवर आपल्या मनोरंजक कथा-कविता, वैचारिक लेख, कोरोनानंतरचे जग, विनोद अशा अनेक साहित्याची मेजवानी देणारा वाचकांच्या आवडीच्या ‘मुक्तागिरी दिवाळी अंका’चे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते बुधवारी सातारा येथे मुक्तागिरी कार्यालयात प्रकाशन झाले. सर्वांनी आवर्जून वाचावा असा दर्जेदार दिवाळी अंक केल्याचे गौरवोद्गार आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी काढले.