बाळासाहेबांच्या नंतर लोणंदकरांच्या मी ठामपणे पाठीशी

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी बागवानांच्या शोकसभेत व्यक्त केला विश्‍वास
Published:Mar 31, 2021 06:01 PM | Updated:Mar 31, 2021 06:01 PM
News By : Muktagiri Web Team
बाळासाहेबांच्या नंतर लोणंदकरांच्या मी ठामपणे पाठीशी

‘सातारा जिल्हा काँग्रेसचे आधारस्तंभ व लोणंदवर प्रेम करणारे स्व. बाळासाहेब बागवान यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. बाळासाहेब व माझा अत्यंत घनिष्ठ संबंध कायम राहिला आहे. माझ्या आई स्व. काकीसाहेबांच्यापासून बाळासाहेब काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते राहिले आहेत. त्यांनी लोणंद व खंडाळा तालुक्यातील जनतेसाठी अहोरात्र कष्ट घेतले. काँग्रेस पक्ष या भागात वाढविण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते. लोणंदच्या विकासासाठी जसे बाळासाहेब आग्रही असायचे त्याचप्रमाणे लोणंदकरांसाठी मी कायमच आग्रही असेण.