वाठार -मालखेड ता.कराड येथे दैनिक मुक्तागिरीच्यावतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित आलेल्या विशेष अंकाचे प्रकाशन युवानेते इंद्रजित चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवाजीराव मोहिते,सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी देवदास माने, सुरेश माने, तंटामुक्ती अध्यक्ष पंकज बुरंगे, सरपंच इंद्रजित ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य तानाजी माने, ग्रामपंचायत सदस्या अंजना बुरंगे,अलका सावंत, बाळुताई सुतार,वसंत शिवदास,जि.प.शाळा मालखेडचे मुख्याध्यापक कदम व सर्व शिक्षकवर्ग, गणेश निकम, संदीप मोहिते, हणमंत कोळी,संजय माने, श्रीकांत चरणकर, राजेंद्र लोकरे, विजय होवाळ, अनिल माने,पोपट ठोंबरे, जगन्नाथ कोळी इत्यादी व मालखेड ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी इंद्रजित चव्हाण यांनी आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दैनिक मुक्तागिरीने प्रसिद्ध केलेल्या विशेष अंकाचे कौतुक केले.