खटाव तालुक्यात तीन दिवसांत कोरोनाने गाठले दीड शतक

सहा बाधितांचा मृत्यू; निमसोडकरांमध्ये घबराट, काळजी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन
Published:Sep 03, 2020 11:33 AM | Updated:Sep 03, 2020 11:33 AM
News By : Muktagiri Web Team
खटाव तालुक्यात तीन दिवसांत कोरोनाने गाठले दीड शतक

खटाव तालुक्यात मागील तीन दिवसांत कोरोनाचे 167 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी सहा रुग्णांचा बळी गेला आहे. निमसोडमधे दोन दिवसांत 10 रुग्ण सापडले आहेत. यापैकी एका 70 वर्षीय वृद्धाचा सातारा येथे मृत्यू झाल्याने परिसरात चांगलीच घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. तसेच खटाव तालुक्यात व निमसोडमध्ये वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रार्श्‍वभूमीवर 10 दिवस लॉकडाऊन करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.