म्हसवड पालिका व पोलीस यंत्रणेत ताळमेळ जुळेना 

शहरात बाधित रुग्ण फिरताहेत मोकाट; निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याची गरज
Published:Apr 25, 2021 11:26 AM | Updated:Apr 25, 2021 11:26 AM
News By : Muktagiri Web Team
म्हसवड पालिका व पोलीस यंत्रणेत ताळमेळ जुळेना 

म्हसवड शहरातील कोरोनाबाधित रस्त्यावर फिरत असल्याने कोरोना वाढत आहे. या लोकांच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आरपीआय नेते किशोर सोनवणे यांनी केली आहे. ‘जनता कर्फ्यू’चे तीनतेरा वाजल्यामुळे म्हसवड पालिका व पोलीस यंत्रणेत ताळमेळ जुळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शासनाच्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.