लोणंदच्या ‘डोंगर ग्रुप’ने तारकर्लीच्या समुद्रात फडकावला 321 फूट तिरंगा ध्वज

‘विजय दिवसा’चं औचित्य : गु्रपच्या 41 सदस्यांचा सहभाग; अन्वय अंडरवॉटर सर्व्हिसेसचे मोलाचे सहकार्य
Published:Dec 15, 2020 01:27 PM | Updated:Dec 15, 2020 01:27 PM
News By : Muktagiri Web Team
लोणंदच्या ‘डोंगर ग्रुप’ने तारकर्लीच्या समुद्रात फडकावला 321 फूट तिरंगा ध्वज

भारताच्या सैन्याने स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीत पाकिस्तान सैन्याला धूळ चारून पाकिस्तान पासून बांगलादेश या स्वतंत्रदेशाची निर्मिती केली होती. आज 16 डिसेंबर रोजी या ऐतिहासिक घटनेला एकोणपन्नास वर्षे पूर्ण होऊन पन्नासावे वर्षे लागत आहे. याच घटनेचे औत्सुक्य साधून लोणंद येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या 41 सदस्यांनी तारकर्ली-मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने समुद्रामध्ये सुमारे 321 फूट तिरंगा ध्वज फडकावून भारतीय सैन्याच्या शौर्याला आगळावेगळा सलाम करून समुद्रामध्ये विजय दि