केंद्रातील चुकीच्या धोरणामुळे देशातील लोकशाही धोक्यात

संपर्क नेते सतेज पाटील यांची साताऱ्यात टीका  : सातारा जिल्ह्यात 75 किलोमीटरची गौरव पदयात्रा
Published:Aug 04, 2022 08:12 PM | Updated:Aug 04, 2022 08:12 PM
News By : Satara
केंद्रातील चुकीच्या धोरणामुळे देशातील लोकशाही धोक्यात

देशात केंद्र सरकारने जीएसटी आणि इतर सरकारी धोरणांचा चुकीचा वापर केल्याने महागाई प्रचंड वाढली आहे. काही यंत्रणांचा गैरवापर होत असून त्यामुळे येथील लोकशाही धोक्यात आल्याची टीका माजी गृहराज्यमंत्री व कॉंग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी साताऱ्यात केली. महाराष्ट्रात मंत्रीमंडळ स्थापन व्हावे, यासाठी आम्हालाच राज्यात मोर्चे काढावे लागतील, असा उपरोधिक टोला त्यांनी राज्यातील शिंदे व भाजप युती सरकारला लगाविला.