ग्रामविकासासाठी पत्रकाराची राजकारणात एन्ट्री

स्वप्नील कांबळे यांची अनफळे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड
Published:Feb 27, 2021 03:08 PM | Updated:Feb 27, 2021 03:08 PM
News By : Muktagiri Web Team
ग्रामविकासासाठी पत्रकाराची राजकारणात एन्ट्री

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुका मोठ्या चुरशीने पार पडल्या. यात अनेक युवा वर्गाची राजकारणात झालेली एन्ट्री गावच्या विकासाला पारंपरिक चाकोरीमधून आधुनिक विकासाच्या परिवर्तनाकडे नेणारी ठरणार आहे. याप्रमाणेच अनफळे (ता. खटाव) या दुर्लक्षित असणार्‍या छोट्याशा गावाच्या विकासासाठी गावातील सुपुत्र स्वप्नील कांबळे यांनी पत्रकारितेच्या प्रवाहातून थेट निवडणुकीत बिनविरोध होत राजकारणात एन्ट्री केली आहे.