नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेत प्रा. श्रीधर साळुंखे यांचे व्याख्यान 

 व्याख्यानमालेचे यंदाचे ९९ वे वर्ष 
Published:May 19, 2022 05:22 PM | Updated:May 19, 2022 05:53 PM
News By : Muktagiri Web Team
नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेत प्रा. श्रीधर साळुंखे यांचे व्याख्यान 

सातारा येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध वक्ते प्रा. श्रीधर साळुंखे यांना नाशिक येथील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या वसंत व्याख्यानमालेत मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून व्याख्यानमालेचे यंदाचे ९९ वे वर्ष आहे. प्रा. साळुंखे यांचे व्याख्यान दि. २० मे रोजी नाशिक येथील गोदाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगणात होईल. "मानवी जीवनातील संवादाचे महत्त्व" या विषयावर प्रा. साळुंखे मार्गदर्शन करणार आहेत.