जरंडेश्‍वर चालण्यासाठी 'किसन वीर' बंद पाडण्याचा डाव

आमदार महेश शिंदे यांचा विरोधकांवर घणाघात : वाघोली येथे शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचार शुभारंभ
Published:Apr 27, 2022 06:39 PM | Updated:Apr 27, 2022 06:39 PM
News By : Satara
जरंडेश्‍वर चालण्यासाठी 'किसन वीर' बंद पाडण्याचा डाव

भांडवलदारांनी खरेदी केलेला सहकारातील जरंडेश्वर साखर कारखाना चालण्यासाठी किसन वीर सहकारी साखर कारखाना बंद पाडण्याचा घाट विरोधकांनी घातला आहे. निवडणुकीआधीच सभासद शेतकर्‍यांकडून प्रत्येकी 15 हजार रूपये गोळा करून कारखाना चालविण्याचे गणित मांडले जात आहे. नंतर त्याच्या खाजगीकरणाचाही डाव आहे. या विरोधकांना खड्ड्यात घाला, असा घणाघात कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांचे नाव न घेता केला.