सातारा जिल्ह्यातील पुनर्वसनाचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार

खिरखिंडी येथील विद्यार्थ्यांचे बामणोली येथील आश्रम शाळेत पुनर्वसन 
Published:Aug 03, 2022 09:35 PM | Updated:Aug 03, 2022 09:35 PM
News By : Satara
सातारा जिल्ह्यातील पुनर्वसनाचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार

सातारा जिल्ह्यात पुनर्वसनाचे प्रश्न अत्यंत गंभीर आहे. कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या असंख्य खातेदारांचे अद्यापही पूर्णतः पुनर्वसन झालेले नाही. या पुनर्वसन प्रक्रियेची येत्या आठ दिवसात माहिती घेऊन त्या खातेदारांना योग्य त्या सोयी सुविधा देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल अशी स्पष्ट ग्वाही साताऱ्याचे नुतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.