शाहूपुरीच्या सर्वांगीण विकासासाठी कधीच कमी पडलो नाही

आ. शिवेंद्रसिंहराजे; पेढ्याचा भैरोबा, समाधीचा माळ रस्त्यांचे भूमिपूजन
Published:Mar 31, 2021 06:03 PM | Updated:Mar 31, 2021 06:03 PM
News By : Muktagiri Web Team
शाहूपुरीच्या सर्वांगीण विकासासाठी कधीच कमी पडलो नाही

‘सातारा शहरालगतचे मोठे उपनगर असलेल्या शाहूपुरी येथील विविध प्रकारचे प्रश्‍न सातत्याने सोडवले आहेत. प्रत्येक कॉलनीतील अंतर्गत रस्ते, शाहूपुरीसाठीची नवीन पाणीपुरवठा योजना मार्गी लावली. हद्दवाढीत शाहूपुरीचा समावेश झाला असून, आता या परिसराचा झपाट्याने विकास होणार आहे. शाहूपुरीच्या सर्वांगीण विकासासाठी कधीच कमी पडलो नाही आणि यापुढेही कमी पडणार नाही,’ अशी ग्वाही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.