ऐतिहासिक किल्ले वासोटा सर करण्यासाठी बालमावळ्यांचा उत्साह!

पाच वर्षाच्या चिमुकल्याचे गिरीप्रेमींकडून विशेष कौतुक 
Published:Feb 19, 2021 10:11 AM | Updated:Feb 19, 2021 10:11 AM
News By : Muktagiri Web Team
ऐतिहासिक किल्ले वासोटा सर करण्यासाठी बालमावळ्यांचा उत्साह!

सर्वांचेच लक्ष वेधून घेणारा ऐतिहासिक किल्ले वासोटा पाहण्यासाठी बहुसंख्य पर्यटक व गिरीप्रेमी पर्यटनास येत असून, काही बालमावळ्यांचा उत्साह देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. दरम्यान, सातार्‍यातील हेरंब चव्हाण या पाच वर्षाच्या चिमुकल्याने मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज की जय, या घोषणेच्या स्फुरणाच्या बळावर किल्ले वासोटा पूर्णपणे यशस्वीरीत्या सर केल्याने त्याचे गिरीप्रेमींकडून विशेष कौतुक होत आहे.