सातारा जिल्हा क्षयरोग विभागाला उल्लेखनीय कार्याबद्दल देशपातळीवर ‘ब्रॉन्झ’ पदक

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांची माहिती
Published:Apr 02, 2021 01:04 PM | Updated:Apr 02, 2021 01:04 PM
News By : Muktagiri Web Team
सातारा जिल्हा क्षयरोग विभागाला उल्लेखनीय कार्याबद्दल देशपातळीवर ‘ब्रॉन्झ’ पदक

जगभरात क्षयरोग (टीबी) झपाट्याने वाढत असून, त्यामध्ये भारताचा अव्वल क्रमांक आहे. जगाच्या तुलनेत 27 टक्के रुग्ण भारतात असून महाराष्ट्रात हे प्रमाण 10 टक्के आहे, अशी सध्याची क्षयरुग्णांची सद्य:स्थिती आहे. असे असताना सातारा आरोग्य विभागाने क्षयरोग निर्मूलनासाठी कंबर कसली असल्याने, त्यांच्याच कार्याची पावती म्हणून क्षयरोग उच्चाटनासाठी करत असलेल्या कार्याबद्दल ब्रॉन्झ पदक भारत सरकारतर्फे प्रदान करण्यात आले असून, ही सातारा जिल्ह्याकरिता अभिमानास्पद बाब असल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश पाटील य