विरभद्र कावडे यांच्यावतीने गरजू कुटुंबांना 700 किलो ज्वारीचे वाटप

Published:Jun 14, 2021 04:08 PM | Updated:Jun 14, 2021 04:08 PM
News By : Muktagiri Web Team
विरभद्र कावडे यांच्यावतीने गरजू कुटुंबांना 700 किलो ज्वारीचे वाटप

शंभू महादेवाचे मंदिर बंद असल्यामुळे या परिसरातील लोकांना प्रचंड अडचण निर्माण झालेली होती. जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याची भावना असणारे येथील लोकांना अडचणीच्या काळात सामाजिक व दानशूर लोकांकडून जीवनावश्यक वस्तूंचे किट आणून देणारे सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे सर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी ठेवून साजरा करण्यात आला. मंदिर परिसरातील पुजारी व गरजू कुटुंबांना त्यांनी 700 किलो ज्वारी वाटून वाढदिवस साजरा केला.