विराट कोहेली मैदानाबाहेरही अव्वल; ठरला जगातील पहिला क्रिकेटर

Published:Mar 02, 2021 05:11 PM | Updated:Mar 02, 2021 05:11 PM
News By : Muktagiri Web Team
विराट कोहेली मैदानाबाहेरही अव्वल; ठरला जगातील पहिला क्रिकेटर

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अजून एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. मात्र यावेळी हा रेकॉर्ड मैदानावर नाही तर मैदानाबाहेर करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर विराट कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या 10 कोटी झाली असून तो पहिलाच भारतीय आणि विशेष म्हणजे पहिलाच क्रिकेटर ठरला आहे. जगभरातील खेळाडूंच्या यादीत विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो, लियोनल मेस्सी आणि नेमार ज्युनिअर या यादीत पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.