मांडवे ग्रामपंचायतीत ‘नवीन युवा पर्वा’चा उदय

उपसरपंचपदी प्रा. विजय खाडे यांची निवड : ग्रामस्थ, युवकांमध्ये आनंदाचे वातावरण
Published:Feb 27, 2021 09:42 PM | Updated:Feb 27, 2021 09:42 PM
News By : Muktagiri Web Team
मांडवे ग्रामपंचायतीत ‘नवीन युवा पर्वा’चा उदय

मांडवे (ता. खटाव) येथील उपसरपंच पदाची निवड अतिशय चुरशीने झाली. या निवडीत प्रस्थापित नेतृत्वाला शह देत गावचे युवा नेते व सातारा जि. प. चे चतुर्थश्रेणी कर्मचारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष तुकाराम खाडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने गावामध्ये ‘नवीन युवा पर्वा’चा उदय केला आहे.