जयभवानी विकास मंडळाने शिवजयंतीला केला कोरोना योद्ध्यांचा सन्मान

शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सपोनि वायकर यांच्याकडून उपक्रमाचे कौतूक 
Published:Feb 20, 2021 02:50 PM | Updated:Feb 20, 2021 02:50 PM
News By : Muktagiri Web Team
जयभवानी विकास मंडळाने शिवजयंतीला केला कोरोना योद्ध्यांचा सन्मान

गडकरी आळी येथील जय भवानी विकास मंडळ व शिवगणेश ग्रुपमार्फत शिवजयंतीचे औचित्य साधून कोरोना महामारीच्या या काळामध्ये खर्‍या अर्थाने ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली अशा कोरोना योद्ध्यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळातील युवकांचे कार्य आदर्शवत असल्याचे सपोनि विशाल वायकर यांनी सांगितले.