निढळच्या सरपंचपदी बायडाबाई ठोंबरे यांची बिनविरोध निवड

Published:Feb 27, 2021 05:11 PM | Updated:Feb 27, 2021 05:11 PM
News By : Muktagiri Web Team
निढळच्या सरपंचपदी बायडाबाई ठोंबरे यांची बिनविरोध निवड

खटाव तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या निढळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बायडाबाई संतोष ठोंबरे तर उपसरपंचपदी श्रीकांत बबन खुस्पे यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीनंतर श्री सिद्धिविनायक ग्रामविकास पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.