म्हसवड : या म्हसवड, ता. माण येथून भाटकीकडे दुचाकीवरून जाणार्या शिक्षक दांपत्यास जबर मारहाण करुन गळ्याला चाकु लावून सोन्याचांदीचे दागिने, रोकड असा 55 हजारांचा ऐवज चोरणार् तिघांच्या टोळीला म्हसवड पोलिसांनी राणंद येथे जेरबंद केले. पोलिसांची चाहूल लागलेले तिघे सराईत चोरटे चकवा देवून पळून जावू लागले. तथापि, पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून उसाच्या शेतात लपून बसलेल्या तिघांना पकडले.
याबाबत माहिती अशी, भाटकीकडे दुचाकीवरून जाणार्या शिक्षक दांपत्यास जबर मारहाण करुन ऐवज लुटला होता. या प्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, तिघे संशयीत राणंदमध्ये असल्याची माहिती मिळताच म्हसवड पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांची कुणकुण लागताच चोरटे चकवा देवून निसटले. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग केला व अखेर शेवरी परिसरात ऊसाच्या शेतात दडुन बसलेल्या तिघांना जेरबंद करण्यात म्हसवड पोलिसांना यश आले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी बाजीराव ढेकळे, सहा. पोलीस निरीक्षक, पोना अमर नारनवर, पोना किरण चव्हाण, पोकॉ सुरज काकडे, पोकॉ अनिल वाघमोडे, पोकॉ नवनाथ शिरकुळे, पोकॉ संतोष बागल, पोकॉ रविकिरण जाधव यांनी केली.