सावित्रीबाई फुले यांचे कार्य ऊर्जा व प्रेरणा देणारे 

ना. छगन भुजबळ यांचे मत : नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
Published:Jan 03, 2021 01:26 PM | Updated:Jan 03, 2021 01:26 PM
News By : Muktagiri Web Team
सावित्रीबाई फुले यांचे कार्य ऊर्जा व प्रेरणा देणारे 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य ऊर्जा व प्रेरणा देणार असून, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. हा महिला शिक्षण दिन संपूर्ण भारतात साजरा व्हावा यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे अन्न अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.