इंडोनेशिया ते इंडिया..शंभर वर्षाच्या शाबुदाना खिचडीची चविष्ट कहाणी

Published:Mar 22, 2021 10:59 AM | Updated:Mar 22, 2021 10:59 AM
News By : Muktagiri Web Team
इंडोनेशिया ते इंडिया..शंभर वर्षाच्या शाबुदाना खिचडीची चविष्ट कहाणी

टॅपिओका पर्ल ऊर्फ साबुदाणा आपल्याकडे आला इंडोनेशियातून. टॅपिओका (अथवा कसावा) हा रताळ्यासारखा पिष्टमय, पोटभरीचा भूमिकंद मूळचा ब्राझीलमधला. मेघना सामंतउपवास असो-नसो, मराठी माणसं साबुदाण्याच्या प्रेमात असतात. तसंही, उपवासाला साबुदाणा खावा अशी काही वैदिक काळापासूनची प्रथा नव्हती. कारण तेव्हा साबुदाणा हा प्रकारचभारतातनव्हता. किंबहुना साबुदाण्याची खिचडी (आणि वडे, थालीपीठ इ.) हेभारताच्याखाद्येतिहासात आधुनिकोत्तर- जेमतेम पंचाहत्तर-शंभर वर्षं वयाचे पदार्थ.