अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍या वाहनांवर ‘महसूल’ची कारवाई; तीन ट्रॅक्टर जप्त

Published:Feb 27, 2021 06:35 PM | Updated:Feb 27, 2021 06:35 PM
News By : Muktagiri Web Team
अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍या वाहनांवर ‘महसूल’ची कारवाई; तीन ट्रॅक्टर जप्त

खटाव तालुक्यामध्ये वाळू उपशाने तसेच गौण खनिज उत्खननमुळे नदीपात्र व पुलाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने तहसीलदार किरण जमदाडे यांनी कारवाईचे आदेश देताच आज गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणारी तीन  वाहने तहसीलदार जमदाडे यांच्या पथकाने पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.