सातारा जिल्ह्यातील पाच नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
कराड, फलटण, म्हसवड, रहिमतपूर, वाई नगरपालिकांचा समावेश, 18 ऑगस्ट ला मतदान तर 19 ला मतमोजणी,
Published:1 m 16 hrs 55 min 48 sec ago | Updated:1 m 15 hrs 37 min 49 sec ago
News By : कराड | संदीप चेणगे
कराड: राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या 17 जिल्ह्यामधील 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड, फलटण, म्हसवड, रहिमतपूर, वाई या नगरपालिकाच्या निवडणुका होणार असून 22 जुलै ते 28 जुलै पर्यंत वेबसाईटवर अर्ज भरण्याची मुदत आहे. 29 जुलैला अर्ज छाननी होणार असून 4 ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तर 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून 19 ऑगस्टला निकाल जाहीर केला जाणार आहे.